Current Activities

नेतेच असे वागले अडाणी जनतेचं काय??????

लाईफ जॅकेट असताना देखील वापर न केल्याने माझी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच यांचा मृत्यू

शुक्रवार दि.०२/०८/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता.सरपंच सौ.वंदना पाटील याचे पती सुहास पाटील यांचा व्हाईट आर्मी चे जवान निलेश तवंदकर यांना फोन आला असता.पाणी पुरवठ्याच्या कामानिमित्त जाणार असल्याने लाईफ जॕकेट ची मागणी केली तसे तवंदकर यांनी ६ लाईफ जॕकेत ग्रा.पं.कर्मचारी सागर माने व मा.उपसरपंच अमोल कांबळे यांच्या ताब्यात दिले.त्यानंतर २०-२५ मि. गावातील युवकांचा फोन आला की.ट्रॕक्टर पलाटी मारली बाकीचे वाहत गेलेत ट्रॕक्टर मध्ये ८ जण व्यक्ती होते अशी बातमी समजली.व्हाईट आर्मी चे जवान निलेश तवंदकर,श्रेयश धुमाळे,विश्वनाथ रजपूत,मुके माळगे हे प्रथम जवळ असलेले लाईफ रींग व दोर घेऊन बचावकार्य सुरु करण्यासाठी गेले.गावातील लोकांनी व रेस्क्यू फोर्स च्या जवानांनी ६ जणांना बाहेर काढले. हे ६ जण लाईट खांबाच्या सहाय्याने कडेला येण्याचा प्रयत्न केले.त्यातील बाकीचे २ जण पाण्याच्या प्रवाहात पुढे सरकत गैले अशी माहीती कळाली असल्याने त्यातील बेपत्ता इकबाल बैरागदार यांच्या मुलगा सलमान बैरगदारा यांच्या सोबतीने पाण्याच्या कडेने शेतामध्ये शोध मोहीम सुरु केली.त्यानंतर प्रदिप ऐनापुरे,सागरा सुतार,निलेश वनकोरे व टिम यांनी यांत्रिक बोट दाखल केरुन शोध कार्य सुरु केले.मिळालेले कडेला आलेले ६ जणापैकी १ सुहास पाटील यांचा मृत्यू झाला.बेपत्ता असालेले २ त्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बेरागदार माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे यांनी निलेश तावंदकर दिलेले लाईक वापरले असते आजची परिस्थिती वेगळीच असते या दोघांचा जीव वाचला असता. आजच्या या दुखत घटनेत सर्व कुरुंदवाडकर मदत कार्यास कोणतीही कसर सोडली नाही सर्व ठिकाणी या दुखत घट्ट मुळे सन्नाटा पसरला आहे सर्व नागरिक पोलीस कर्मचारी व इतर पास रेस्क्यू फोर्स वजीर रेस्क्यू फोर्स .एनडीआरएफ चे जवान व. व्हाईट आर्मी तर्फे २२ जणांची टिम शोधा मोहीम मध्ये सामिल आहे..

अशोक रोकडे
व्हाईट आर्मी
कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण NGO समिती अध्यक्ष

व्हाईट आर्मीच्या वतीने विशाळगड दुर्घटनाग्रस्ताना वैद्यकीय सुविधा,अन्नधान्य, कपडे स्वरूपात मदत

विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेवेळी झालेल्या नुकसानीत जवळपास 41 कुटुंबे उघड्यावर आले त्यांच्या मदतीसाठी कोल्हापूर येथील व्हाईट आर्मी धावून गेली आहे. गेले चार दिवसापासून व्हाईट आर्मीच्या वतीने नुकसानग्रस्त लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करून त्यांना त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासून अन्नछत्र उभारून दुर्घटनाग्रस्त झालेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय गेले तीन दिवस करत असून आज प्राथमिक स्वरूपात लागणारे धान्य, भांडी व ब्लॅंकेट, चादर अत्यंत आवश्यक वस्तू प्रत्येक घरपोच करण्यात आले. त्याचबरोबर गेले चार दिवस दहशती व तणावाखाली असलेले सर्व परिवार यात लहान मुले वयोवृद्ध महिला, पुरुष घरातील सर्व लोकना वैद्यकीय सुविधा व्हाईट आर्मी डॉक्टरांमर्फत आज देण्यात आली. मुसलमानवाडी गडकरीवाडी, प्रभुळकरवाडी, त्याचबरोबर विशाळगडावरील जवळपास सव्वाशे लोकांना सर्दी ताप, खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी यावर औषध देण्यात आले डॉक्टर पथकाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार जाधव दोन दिवस गडावर थांबून उपचार करत आहेत या उपक्रमासाठी या मदत कार्यासाठी साहित्य व धान्य यासाठी आमदार ऋतुराज पाटील, उज्वल नागेशकर, संजय नरसिंघानी शाहूवाडी चे प्रांत समीर शिंगटे गजापूर येथील माजी सरपंच व आदर्श शाळेचे संस्थापक संजय सिंग पाटील इमाम गनी, प्रभुळकर दिलावर उमरखान, मालदार यांनी विशेष सहकार्य केले.
व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत वाटप पथक डॉक्टरांचे पथक त्याचबरोबर प्रशांत शेंडे, हनुमंत कुलकर्णी, विजय भोसले, कस्तुरी रोकडे,आदित्य सणगरे, श्रीकांत पाटील, शैलेश रावण, गजापूर परिसरात मदत करत आहेत.

उत्तर गोवा सैन्य भरतीसाठी आलेल्या दहा हजार तरुणांनी व्हाईट आर्मीच्या अन्नछत्र चा लाभ

*दि. 25 जून ते 5 जुलै 2024 रोजी 2 सिग्नल हेडकॉटर बांम्बोली उत्तर गोवा येथे येथे सैन्य भरती साठी आलेल्या तरुणांना व्हाईट आर्मी मार्फत मोफत अन्नछत्र उभारून नुकतीच टीम कोल्हापुरात परत आली या भरतीसाठी सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर तसेच गोवा राज्य येथील तसेच गुजरात, महाराष्ट्र येथील राज्यातून भरतीसाठी तरुण आले होते. व्हाईट आर्मी मार्फत अन्नछत्र उभारण्यात आले होते. दररोज 1000 ते 1500 तरुण या ठिकाणी अमर्यादित जेवणाचा लाभ घेते होते. भरती प्रक्रिया वेळी शारीरिक कोणताही त्रास होऊ नये यासाठी सकस आहार दिला जात होता यामध्ये पांढरा भात कधी जीरा राईस तर डाळीची शेवगा आमटी कधी रस भाजी आणि आंब्याचे लोणचे याचा समावेश होता. या अन्नछत्र चा लाभ जवळजवळ दहा हजारापेक्षा जास्त तरुणांनी घेतला. गेले सतरा वर्ष इंडियन आर्मी व इंडियन एअर फोर्स यांच्याकडून होणाऱ्या भरती प्रक्रिया वेळी सन्मानाने व्हाईट आर्मी मोफत भरती प्रक्रिया वेळी येणाऱ्या तरुणांसाठी जेवणाचे विनंती केली जाते या विनंतीला मान देऊन व्हाईट आर्मी मार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये भरतीवेळी अन्नछत्र राबवले जाते आज अखेर साडेसहा लाख भरतीच्या मुलांनी त्याचा लाभ घेतला आहे . गोवा राज्यात झालेल्या भरती वेळी आर्मी रिक्रुटमेंट चे प्रमुख कर्नल आकाश मिश्रा संजय कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले
या सैन्य भरती अन्नछत्राचे नियोजन
संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे , उज्वल नागेशकर Dr अशोक डोनर याच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेंडे यांच्या नेतृत्वाखाली अमृता गावडे, भारती ठोंबरे, संचीता बाबर निर्मला थापा , तसेच श्रद्धा पाटील, अनिता बागडी, श्रेया पाटणकर, सानिका कोळी, सिद्धीका माने. शैलेश रावण, योगेश सुतार, आदित्य सनगरे,
प्रथमेश भोसले, प्रथमेश कांबळे, समर्थ अष्टगी, संमेश बागडेकर शेखर वर्धन हे सर्व देवचंद कॉलेज निपाणी न्यू कॉलेज राजाराम महाविद्यालय जूनियर कॉलेज शेळोशी गगनबावडाएस एम लोहिया जुनिअर कॉलेज
व्हाईट आर्मी कॅडेट कोर जवानांनी मदत कार्य केले.

व्हाईट आर्मीच्यासलग चार दिवस रेस्क्यू शोध मोहिमेत बेपत्ता असलेला मुलगा नदीपात्रात सोळा फुटी मगरीच्या वास्तव्यात जलपर्णीत मध्ये जिवंत सापडला

४ दिवस चाललेल्या या search rescue operation successful करण्यासाठी आपल्या टीम ने यांत्रिक बोट तसेच drone camera 📸 सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला .
त्याच बरोबर नितेश वणकोरे sir व प्रदीप ऐनापुरे sir yancha अनुभव ही तितकाच महत्वाचा ठरला
याच्या च बरोबर निलेश वनकोरे व निशांत गोरे याची भक्कम साथ ही तितकीच मोलाचं होती
Searching करत असताना दिसणारी मगर बरीच भीती दाखवून जायची पण महाड सारख्या मगरींच्या राजधानी मध्ये उतरून काम केलेली आपली टीम त्याला न घाबरता पुढे आपला काम करत राहिली
आणि दुपारी ३.३० chya दरम्यान जिवंत पणे त्या मुलाला वाचवण्यात यश मिळालं .

एवढाच करून टीम थांबली नाही आहे त्याला वैद्यकीय उपचारासाठी hospital मध्ये दाखल केले आहे प्राथमिक माहिती नुसार त्याचा एक पाय प्रॅक्चर आहे

शतायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल शिरोळ
येथे मुलाला ऍडमिट केले आहे
+919766513773 नितेश वांनकोरे
8657123361 Pradip inapure White Army शिरडोन



https://www.facebook.com/100066948955051/videos/2153255028344547/?mibextid=vq3DPB

https://dhunt.in/TBxmF


https://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/kolhapur-teen-stuck-in-croc-den-for-5-days-saved/articleshow/108742055.cms

व्हाईट आर्मी तर्फे लष्कर भरती प्रक्रियेबाबत मंगळवारी मार्गदर्शन शिबिर


“मी गाडगेबाबा” मिशन प्लास्टिक मुक्त कोल्हापूर

अर्थ वॉरियर, महानगरपालिका आणि दैनिक सकाळ मार्फत याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आपण देखील समाजातील नागरिक म्हणून व्हाईट आर्मी संपूर्ण टीम यामध्ये सहभागी झाली आहे.
🔰आपला रूट आणि संकलन केंद्र मिरजकर तिकटी-पाण्याचा खजिना-आयटीआय-साई मंदिर कळंबा रोड असा आहे.
🔰 दिनाक २३/०२/२०२४ शुक्रवार
🔰 *वेळ सकाळी ७ ते ८ वा.
{सहभागी व्हाईट आर्मी कॅडेट कोअर टीम कॅडेट एस एम लोहिया ज्युनिअर, कॉलेज न्यू कॉलेज राजाराम महाविद्यालय, महाराष्ट्र कॉलेज, विवेकानंद कॉलेज एनएसएस डिपार्टमेंट आणि एनसीसी डिपार्टमेंट सहभागी झाले होते.}


दैनिक सकाळ मार्फत जॉय स्ट्रीट प्रत्येक रविवारी दिनांक 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायबर चौक, सर्किट हाऊस, रंकाळा पदक गार्डन, आणि ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोड येथे सकाळी सहा ते साडेनऊ या वेळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक दाखवताना सर्व साहित्यसह व्हाईट आर्मीचे प्रशांत शेंडे सर आणि सहकारी.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ जी शिंदे यांना यावर्षीचा ‘देवदूत’ पुरस्कार देण्यात आला.

व्हाईट आर्मीच्या 24 व्या वर्धापन निमित्त मा. मुख्यमंत्र्यांना देवदूत पुरस्कार ग्रेट ह्युमिनिटी हा आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहात व्हाईट आर्मीच्या वतीने देण्यात आला.


सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व केरळची शाल असे व्हाईट आर्मीचे अध्यक्ष श्री. अशोक रोकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा. राजेश क्षीरसागर, कोल्हापूरचे माजी पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर, खासदार मा. संजय मंडलिक, आमदार मा. प्रकाश आबिटकर, देवाचंद कॉलेज चे श्री. अशोक डोनर, अँडव्हेकेट श्री. धनंजय पठाडे, श्री. जयेश ओसवाल, त्याचबरोबर सचिन भोसले, प्रशांत शेंडे, डॉक्टर शर्वरी रोकडे, विनायक भाट, नितेश वनकुरे, शैलेश रावण, व्हाईट आर्मी स्कूलच्या मुख्याध्यापिका माया सातपुते व दिपाली भोसले, शैलजा परमने, मर्जीना सय्यद, साजिदा कमते, शफिक मुल्ला त्याचबरोबर न्यू कॉलेज, एस एम एल कॉलेज, राजाराम कॉलेज व व्हाईट आर्मी कॅडेट कोर चे जवळपास 100 जवान उपस्थित होते.

सन्मानपत्र

सन्मानचिन्ह

दि. 21.01.2024 रोजी सायंकाळी चार वाजले पासून ते अकरा वाजेपर्यंत.ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी श्रीरामलल्ला आनंद उत्सव यात्रा मध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गर्दी अगर काही होऊ नये यासाठी स्वयंसेवक नियोजन केले.
मार्ग बिंदू चौक मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संपन्न. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी रोकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
प्रशांत शेंडे सर यांच्या नियोजनाखाली शैलेश रावण, सनमेश बागडीकर, समर्थ अष्टगी यांनी नियोजन केले.

covid-19 शासकीय रुग्णवाहिकेत, 108 ऍम्ब्युलन्स आर्मी कडून मोफत निर्जंतुकीकरण स्प्रे सेवा

https://bit.ly/2RAdFiZ

 

Corona Ground Report कोल्हापुरातील व्हाईट आर्मी कडून नागरिकांना मोफत जेवण ( ABP Maza २४ एप्रिल २०२० )

 

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरला वीस बेड प्रधान

 

कोल्हापूरकरांचा दिलदारपणा ( Kolhapur Breaking १७ सप्टेंबर २०२०)

 

लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आलेल्यांसाठी व्हाईट आर्मीचा मिळतोय आधार (BNews १५ एप्रिल २०२०)

 

१०३ वर्षाच्या आजीबाई पडल्या कोरोना वर भारी (Tarun Bharat News ९ सप्टेंबर २०२०)

 

शारदीय नवरात्र उत्सव श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे नवरात्र काळात मोफत हॉस्पिटल मोफत वैद्यकीय सेवा 25 सप्टेबर 2017

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1582294991792409&id=1059617197393527

 

कोल्हापूरची व्हाईट आर्मी टीम सरसावली केरळच्या मदतीला (B news २० ऑगस्ट २०१८)

https://yutu.be/ZxPM_m38JLE

 

धोकादायक इमारतीची गच्ची कोसळली आणि एकच गोंधळ उडाला घटनास्थळी अग्निशमन व्हाईट आर्मीचे जवान हजर. ( MAHA News Live १४ ऑक्टोबर २०१८ )

 

गाय आणि नवजात वासराची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका (BNews ४ डिसेंबर २०१८)

https://yutu.be/2R5nnUf_OJc

 

व्हाईट आर्मीच्या मदतीने गोंडस वासराला मिळाले जीवदान

(ABP Maza ८ डिसेंबर २०१८ )

 

इंडियन एअर फॉर्स भरती साठी येणाऱ्या तरुणांसाठी मोफत अन्नछत्र धुळे, (४ ते ५ फेब्रुवारी २०१९)

 

109TA BN Army Rally भागीरथी, आमदार धनंजय महाडिक आणि व्हाईट आर्मी संस्थेच्या वतीने भरती होणाऱ्या उमेदवार यांना जेवणाची व्यवस्था (BNwes २६ फेब्रवारी २०१९)

https://yutu.be/CWUOrQO2yZ8

 

17 ते 20 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या जोतिबा यात्रेसाठी व्हाईट आर्मी सज्ज (BNews १३ एप्रिल २०१९)

 

वसगडे येथे मुरचीत अवस्थेत सापडलेल्या मोराला कोल्हापुरात उपचार करून सोडलं मोकळ्या हवेत. ( १६ एप्रिल २०१९)

 

तिवरे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी तिवरे डॅम फुटल्यामुळे काही गावात पाणी शिरले आणि लोक मरण पावले ( ABP Maza ,३ जुलै २०१९)

https://youtu.be/Ba2HuiDnMO8

 

भोसरी पुणे वायुसेना २३ ते २७ जुलै २०१९ सैन्य भरतीसाठी पुण्यात येणाऱ्या उमेदवारांना व्हाईट आर्मी संस्थेच्यावतीने मोफत अन्नछत्र ( BNews १९ जुलै २०१९)

 

वांगणी बदलापूर श्री महालक्ष्मी एक्स्प्रेस ला पुराच्या पाण्याचा वेढा ( ABP Maza २७ जुलै २०१९)

https://youtu.be/uurlat-qoU8

 

वायुसेना सैन्य भरतीसाठी पुण्यात येणाऱ्या उमेदवारांना व्हाईट आर्मी संस्थेच्या वतीने मोफत अन्नछत्र पहिल्या दिवशी दोन हजार उमेदवारांनी घेतला लाभ. (BNews २३ जुलै २०१९ )

 

कोल्हापूर पुराच्या पाण्यात वाढ, व्हाईट आर्मी सज्ज ( झी 24 taas ४ ऑगास्ट २०१९ )

 

व्हाईट आर्मीच्या जवानांनी केली मंदिरात अडकलेल्या तिघांची सुटका सांगलीच्या महापुरातून. ( साम TV ८ ऑगस्ट २०१९)

 

सोलापूर युनिव्हर्सिटी युवा महोत्सव यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत व्हाईट आर्मी जवानांनी दिली माहिती आणि ओळख (BR News सोलापूर २६ सप्टेंबर २०१९)

 

व्हाईट आर्मी आणि श्री महालक्ष्मी अंबाबाई हकदार श्रीपूजक यांच्यावतीने नवरात्र उत्सवाची सांगता रक्तदान शिबिराने 1000 बाटल्यांचे होणार संकलन( BNews ९ ऑक्टोबर २०१९)

 

आपत्ती व्यवस्थापन माहिती साहित्य ओळख निर्माण चौक, व्हाईट आर्मी कोल्हापूर स्वयंसेवकांचे लष्कर Army Of Volunteers (Lokmat १८ नोव्हेंबर २०१९)

 

Womens Day Special कोल्हापुरातल्या व्हाईट आर्मीतील तरुणींशी कामगिरी, पहा स्पेशल रिपोर्ट ( News 18 Lokmat ८ मार्च २०२०)

 

covid-19 instruction by sitali Mehta Volunteer white Army , Nirankari Colony Gandhinagar Kolhapur (२८ एप्रिल २०२०)

 

व्हाईट आर्मी ही आपत्कालीन सेवेमध्ये काम करणारी शिखर संस्था यांच्या मार्फत मोफत अन्न वाटप covid-19 ( सतर्क पोलिस टाईम्स न्युज महाराष्ट्र २८ एप्रिल २०२०) हर्षल सुर्वे सर

 

दररोज चारशेहून अधिक गरजूंना भोजन दिले जात आहे दहा हजार लोकांनी घेतला लाभ. ( BNews ३ एप्रिल २०२० )

 

हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर लॉकडाऊन काळात व्हाईट आर्मी कडून मोफत अन्नछत्र

(फेसबूक न्यूज २६ एप्रिल २०२० )
https://m.facebook.com/story.php?story_fbid=869158690156341&id=190676204671263

 

मजुरांच्या सेवेसाठी राबणारी व्हाईट आर्मी (Lokmat news)

 

White Army Big Achivement ( Speed News ५ जून २०२०)

 

World Saali Samaj Interview White Army President Ashok Rokade (२३ ऑगस्ट २०२० )

 

महाड रायगड बिल्डिंग अपघात सर्च अंड रेस्क्यू ऑपरेशन व्हाईट आर्मी ( ZEE 24 तास २५ ऑगस्ट २०२०)

https://raigadtimes.co.in/tag/rescue-operation-at-mahad/

 

महाडमध्ये कोल्हापुरातील वाईट आर्मी तर्फे बचावकार्य सुरू

https://www.lokmat.com/kolhapur/rescue-operation-started-white-army-kolhapur-mahad-a292/

Photos | Maha collapse, heartbroken relatives and rescue operations


 

महाड दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

https://tarunbharat.com/dailynews/843579

 

रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकरी निधी चौधरी यांच्या हस्ते व्हाईट आर्मीचा सत्कार करण्यात आला.

लाईव्ह मराठीवर
https://www.livemarathi.in/honoring-white-army-who-helped-in-the-mahad-tragedy/
http://bnewskolhapur.com/?n=17&m=9&o=19885

 

महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये साहाय्य केलेल्या कोल्हापूर येथील ‘व्हाईट आर्मी’चा सत्कार

https://sanatanprabhat.org/marathi/404311.html
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bhiwandi-building-collapse-live-updates/liveblog/78225880.cms

 

जैन बोर्डिंग व्हाईट आर्मी कोविड केअर सेंटरला महापौर निलोफर आजरेकर यांची भेट

https://public.appls/Laazd

 

एक दिवसाची बाळंतीण शुभ्राच बारस (१७ सप्टेंबर २०२० )

https://youtu.be/NR9cGuL_bAK

https://www.lokmat.com/kolhapur/corona-virus-rangala-barasha-ceremony-kovid-center-a292/


भावी सैनिकांसाठी व्हाईट आर्मी अन्नपूर्णा

रत्नागिरी येथे दि. 17 ते 27 नोव्हेंबर 2019 रोजी सैन्य भरती मेळाव्यामध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मी च्या वतीने सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारले होते, या दहा दिवसांत भरतीसाठी आलेल्या 21 हजार तरुणांनी या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. मागील 14 वर्षा पासून सुरू असलेल्या अन्नछत्रमध्ये आज अखेर भरतीसाठी आलेल्या पाच लाख तरुणांनी लाभ घेतला. 

रत्नागिरी येथे छ. शिवाजी स्टेडियम येथे भरती प्रक्रियांमध्ये पुणे विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर तसेच रत्नागिरी, सांगली, सातारा,  कोल्हापूर, सिंधुदुर्ग, व गोवा राज्यातील हजारो मुलांची सैन्य भरती प्रक्रिया घेण्यात आली. खासकरून एआरओ ऑफीस चे कर्नल अनुराग सक्सेना यांनी भरती काळात भरतीसाठी आलेल्या मुलांना अन्नछत्र उभारण्यासाठी व्हाईट आर्मी स विनंती करण्यात आली होती. आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे.

व्हाईट आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेंडे हणमंत कुलकर्णी यांच्या नियोजना अंतर्गत सुनील जाधव, सुमित साबळे,प्रेम पोवार, अविनाश भांडवले, प्रकाश पाटील, विकी खेडेकर, आदेश कांबळे, संतोष यादव, सुशांत पाटील, आणि देवचंद कॉलेज निपाणी चे विक्रम भोसले, ऋषिकेश कुंकेकर, आशितोष कावरे, गणेश परीट, व्यंकटेश घोडके, सुरज चोपडे, ओंकार चोपडे, ओंकार कोपर्डे, सतीश आंबी इत्यादींनी विशेष सहभाग घेतला.

ररत्नागिरी स्थलसेना भरतीसाठी रत्नागिरी येथील नितीन सतोसकर, सुनील बोगाळे, कोल्हापूरमधील शाहू मार्केट यार्ड मित्र मंडळ सेवा भावी संस्थेचे किरण आरदाळकर, कुमार आहुजा, विवेक शेटे, राजेश मसाले, संजय कामत यांनी विशेष मदत केली.

विशेष सहकार्य रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक संस्था आणि तरुणांचे लाभले.

स्थल सेना भरती साठी आलेल्यातरुणांची भोजन व्यवस्था करताना व्हाईट आर्मी चे जवान.

no images were found


Kolhapur and Sangli Flood situation to save thousands of lives


कोल्हापुरातील व्हाईट आर्मीची टीम ओडीसाला रवाना…

From.Kolhapur team.of 21 volunteers of White Army including 3 doctors headed towards orissa with full stock medicine and rescue material for help as well as White Army team is planning the relif work in coming days as the Fani cyclone gets slower or moves towards the Northen part of Bay of Bengal

Team is led by Ujjwal Nageshkar
Here in kolhapur Ashok.Rokade and Dr Sheetal Patil.are coordinating the Mission Fani Cyclone and will give Maximum support and help.from White Army to the Rescue and Relief work in Orissa

Our team.will reach on the location till tomorrow afternoon
Team has lot of rescue material with inflabale rescue Boat has been provided to the White Army team
Those who want to support the cause or also contribute in any form of help also there is an appele to Doctors who want to give services to affected are requested to contact these numbers
9850079801
9422043421
Or also can Contact White Army office Kolhapur🙏🏻

Are trying to get in touch with Government Authorities there to get our work done there

no images were found


Industrial Disaster Training Program Date: 08/03/2019

Tendy Wheels Pvt. Ltd. येथे जीवन मुक्ती सेवा( NGO) व्हाईट आर्मी अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या सहयोगाने आपत्कालीन मदत वर्कशॉप (Disaster Management workshop)घेण्यात आले.यामध्ये व्हाईट आर्मीचे तज्ञ प्रशिक्षक प्रशांत शेंडे यांनी वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थिती कशी हताळायाची याची प्रात्यक्षिक सादर केली आणि कंपनीच्या कर्मचारी यांच्याकडून करवून घेतलीत.

यावेळी कंपनीचे चेरमन उदय लोखंडे ,सी ई ओ दीपक जाधव, सर्विस जी एम प्रशांत तोडकर, एच आर पंडित भोसले,राहुल पाटील,सतीश परमाज, मदन डांगे तसेच महिंद्रा कंपनीचे कस्टमर केअर मॅनेजर महेश देशमुख व निलेश भुर्के आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

no images were found


व्हाईट आर्मीच्या माध्यमातून 109TAभरतीसाठी मोफत छत्र सुरू

25 फेब्रुवारीपासून तीन दिवस कोल्हापुर कृषि महाविद्यालय येथे 109 TA बटालियन ची भरती सुरु आहे या भारती साठी येणारी मुलाना white army च्या वतीने मोफत जेवण सुरू आहे रोज 4000 ते 5000 मुलांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे

या देशप्रेमि उपक्रमा साठी white army चे महिला व पुरुष जवान परिश्रम घेत आहेत

no images were found


व्हाईट आर्मीच्या माध्यमातून एअरफोर्स भरतीसाठी ही आता मोफत छत्र – *धुळे येथे मोफतअन्नछत्र

कोल्हापूर : व्हाईट आर्मीच्या वतीने सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी करण्यात येणाऱ्या मोफत अन्नछत्र सेवेची दखल आता एअर फोर्स नेही घेतली आहे. धुळे येथे होणाऱ्या एअरफोर्सच्या भरतीसाठी व्हाईट आर्मीच्या जवानांना या ठिकाणी मोफत अन्नछत्रसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. व्हाईट आर्मी चे विनायक भाट यांच्या नेतृत्वाखाली नऊ जणांची टीम रवाना झाली या मोफत अन्नछत्रमद्ये सहा हजार मुलानी लाभ घेतला .

विंग कमांडर D Dhar.सेंटर ऐर्मन सिलेक्शन बोर्ड इंडियन एयर फोर्स,न्यू दिल्ली,विंग कमांडर अजय नौतीयाल CO 6 ASC,मुंबई.यानी अन्नछत्र भेट देऊन white army चे या देशप्रेमी उपक्रमाची कौतुक केले

व्हाईट आर्मीने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात आपला दबदबा तयार करून व आपला वेगळा ठसा उमटवला आहे. देशात कोणतीही आपत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी मदतीचा हात देण्यासाठी व्हाईट आर्मी सदैव पुढे असते. देशसेवा करण्यासाठी सैन्य भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची पोटाची खळगी भरण्यासाठी मोफत अन्नछत्र सेवेची संकल्पना व्हाईट आर्मीच्या वतीने सुरू करण्यात आली. कोल्हापुरात होणाऱ्या प्रत्येक भरतीच्या वेळी आर्मीच्या वतीने याची सोय केली जाते. या सेवेची दखल आता एअर फोर्सच्या वतीने घेण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी व देश सेवेसाठी या माध्यमातून ही सेवा अखंडपणे सुरू आहे. व्हाईट आर्मीच्यावतीने 13 वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत या मोफत जेवणाचा 5 लाखाहून अधिक मुलांनी लाभ घेतला आहे. सैन्यभरतीवेळी मोफत जेवणाची सुरवात भारतात पहिल्यांदा व्हाईट आर्मीच्यावतीने करण्यात आली. एअर फोर्सने या कार्याची दखल घेतली. या आधी जळगाव व गोवा राज्यात ही व्हाईट आर्मीने ही सेवा केली आहे. धुळे येथे सुरू झालेल्या भरतीसाठी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात होते . सहा हजार मुलानी लाभ घेतला आहे.सतिश आंबी.शेलेश रावण.मयुरेश कोरडे.धैर्यशील निगड़े.महेश पुजारी.स्वजित जांभळे.धैर्यशील यादव.कुलदीप कांबळे.white army चे जवान परिश्रम घेतले

सी.पी.आर. हॉस्पिटल मधील रुग्णांना मदतीचा हात

व्हाईट आर्मी तर्फे आरोग्यसेवा व मदतकार्य उपक्रम

कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य परीचारीका संघटना तर्फे बुधवार दिनांक २३ व २४ फेब्रुवारी, २०२२ या दोन दिवसीयराज्यव्यापीसंप पुकारला आहे या संपामुळे सी.पी.आर.हॉस्पिटल मध्येनव्याने दाखल होणाऱ्या तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी तर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या अंतर्गत व्हाईट आर्मी ने रुग्णसेवा व आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मदतकार्य शिबिराचे आयोजन केले आहे.

व्हाईट आर्मीचे शिबीर दोन दिवस राबविण्यात येणार असून यामध्येव्हाईट आर्मीचे ४० (मुले, मुली) जवळ सलग दोन दिवस वैद्यकीय सेवा व मदतकार्यास तत्पर असणार आहेत. व्हाईट आर्मीचे जवान सी.पी.आर.हॉस्पिटल मधील अपघात विभाग, अतिदक्षता विभाग,… आदीसहविविधविभागांच्या ठिकाणी मदतकार्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत. दोन दिवस महाराष्ट्र राज्य परीचारीका संघटना तर्फेत्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. या काळात सी.पी.आर.हॉस्पिटल मधील रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता व्हाईट आर्मी च्या जवानांनी पुढाकार घेतला आहे

कोल्हापूर राष्ट्रीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत काम करणार्या जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने चैत्र पोर्णिमा यात्रा वाडी रत्नागिरी येथे दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी झाली जोतिबा यात्रेवेळी येणार्या भाविकांना तसेच प्रशासनाला मदत करण्यासाठी व्हाईट आर्मी तर्फे विविध सामाजिक उपक्रम व आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत दि. १४.०४.२०२२ ते १८.०४.२०२२ या कालावधीत संस्थेने गेली १८ वर्ष जोतिबा डोंगर येथे विविध सामाजिक  सुविधा यात्रेकरूंना देण्यात आल्या.

जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जोतिबा यात्रेनिमीत्त विविध सामाजिक सुविधा देण्यात आल्या या सुविधा पुढीलप्रमाणे:  व्हाईट आर्मी हॉस्पीटल, रेस्क्यू टिम, आपत्कालिन कक्ष (कंट्रोल रूम), हार्ट ब्रिगेड, रुग्णवाहिका, शोध मोहिम, विश्रांती गृह / हिरकणी कक्ष इत्यादी 

कोल्हापूर शहरामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी महोत्सव

कोल्हापूर शहरामध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सव अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांचे समन्वयाने शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्ते या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात यावे असे मा. प्रशासकसो यांनी निर्देशित केलेले आहे. याप्रमाणे कोल्हापूर महानगर पालिका व जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी यांच्या समन्वयाने दि. ०४-०५-२०२२ ते ०६-०५-२०२२ अखेर पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.    

 

जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी व व्हाईट आर्मी स्कूल यांच्या प्रयत्नातून ०५-०५-२०२२ रोजी पंचगंगा नदी व पंचगंगा घाट याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी नदीमधील प्लास्टिक कचरा, पिशव्या तसेच निर्माल्य काढले आणि घाटावरील प्रवासी भाविकांकडून टाकण्यात आलेला कचरा वेचण्यात आला. हि मोहीम सकाळी ०७:०० ते ०९:३० पर्यंत करण्यात आली. या मोहिमेत व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते सुरज साळोखे, सचिन भोसले, प्रशांत शेंडे, शंकर केंगार, विनायक भाट, सौरभ पाटील, प्रवीण आमते, अखिलेश शेंडे व्हाईट आर्मी स्कूलचे शिक्षक माया सातपुते, संध्या मोरबाळे, दिपाली भोसले, संतोष कोळेकर, शिरीष मोरे, अर्चना कोळेकर, राजश्री ठाकरे, हमीदा देसाई, रामदास कांबळे, मर्जीन सय्यद व बालचमू नी हिरीरीने सहभाग घेतला होता.

© 2024 | White Army